मंडणगड | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 2024 यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या सतरा प्रमुख मांगण्याकरिता राज्यभरात पुकारण्यात आलेल्या दोन दिवसांचे काम बंद आंदोलनास मंडणगड तालुक्यातून शंभर टक्के पाठींबा मिळाला आहे. या आंदोलनात मंडणगड तालुक्यातील प्रफुल्ल खैरे, अमोल कोंळंबेकर, सुरज माळी, अभिषेक गोरीवले, धिरज कदम,अनिल सावर्डेकर, दामोदर पालेकर, व मंडणगड उपविभागातील सर्व कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहेत.
महानिर्मीती महावितरण आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांतील कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ, रोजंदारी कामगार पध्दती व्दारे शाश्वत रोजगार या दोन प्रमुख मागण्यांसह कर्मचाऱ्यांचे सतरा मागण्यांची पुर्तता करण्यात यावी या करिता उपरोक्त संघटनेच्यावतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यासह सर्व संबंधीत यंत्रणांना 7 फेब्रुवारी 2024 रोजी लेखी निवेदन देण्यात आले आहे. या मागण्याचा विचार न झाल्याने 9 फेब्रुवारी 2024 पासू सहा टप्यांचे आंदोलनास सुरुवात झाली आहे. यातीत पाचव्या टप्याच्या दोन दिवसांचे काम बंद धरणे आंदोलनास आज सुरुवात झाली. स्थानीक पातळीवर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका शाखा मंडणगड यांच्यावतीने आंदोलनास पाठींबा देण्यात आला.











