शिरोडा-वेळागर येथील श्री देव लिंगेश्वराचा ३ मार्च रोजी २१ वा वर्धापन दिन..

वेंगुर्ले | प्रतिनिधी : शिरोडा- वेळागर येथील श्री देव लिंगेश्वर मंदिर मंदिराचा २१ वा वर्धापन दिन रविवार ३ मार्च रोजी विविध धार्मिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातून संपन्न होणार आहे.

शिरोडा वेळागर येथील श्री देव लिंगेश्वर मंदिर वर्धापनदिन सोहळा मिती माघ कृ. ७ शके १९४५ रविवार दि. ३ मार्च रोजी संपन्न होत आहे. त्या निमीत्त सकाळी ८ वाजता धार्मिक विधी, लघुरुद्र, सकाळी ९ वाजता वरदशंकर महापूजा, दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १२.३० ते ३ वाजेपर्यत महाप्रसाद, संध्याकाळी ६ ते ७ वाजता भाविकांची भजने, रात्रौ ७ ते ८ वाजता ‘श्रीं’ ची पालखी, रात्रौ ८ ते ९ वाजता बक्षिस वितरण समारंभ, रात्रौ १० वाजता खानोलकर दशावतार नाट्यमंडळ, खानोली यांचा दणदणीत दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तसेच महाशिवरात्री उत्सव शुक्रवार दि. ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता धार्मिक विधी, अभिषेक, संध्याकाळी ४ वाजता किर्तन, रात्री ७ वाजता ‘श्रीं’ ची पालखी, रात्री ८ वाजता आरोलकर दशावतार नाट्यमंडळ यांचा दणदणीत दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे.

श्री देव लिंगेश्वर मंदिरांत होणाऱ्या या सर्व कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव लिंगेश्वर देवस्थान समिती व सल्लागार यांचेतर्फे करण्यात आले आहे.