मसुरे | झुंजार पेडणेकर :राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कलाउत्सव 2025 या स्पर्धेमध्ये श्री भगवती हायस्कूल मुणगे प्रशालेतील विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. न्यु इंग्लिश स्कूल, कसाल येथे झालेल्या स्पर्धेत विविध कला प्रकारांमध्ये प्रशालेतील विद्यार्थी सहभागी झाल होते.
या कलाउत्सव स्पर्धेत दृश्यकला समुह – स्वदेशी खेळणी तयार करणे या कलाप्रकारात इ. 10 वी तील विद्यार्थीनी कु. मृगाक्षी मंगेश हिर्लेकर व कु. सुहानी सत्यवान लब्दे या विद्यार्थीनींनी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. स्वदेशी खेळण्यांमध्ये सुबक अशा कळसूत्री बाहुल्या या विद्यार्थीनीनी बनवल्या होत्या.
या विद्यार्थ्यांना कलाशिक्षिका सौ. गौरी तवटे यांचे मार्गदर्शन लाभले. सहभागी व यशस्वी विद्याथ्याचे शाळा व श्री भगवती एज्यु. सोसायटी मुणगेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.













