वैभव दीपक पटवर्धन यांना विवाहप्रित्यर्थ निलेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा

रत्नागिरी : भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा बँकेचे संचालक ऍड. दीपक पटवर्धन यांचे सुपुत्र चि. वैभव याच्या विवाहाप्रित्यर्थ आयोजित स्वागत समारंभाला भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत सोबत माजी आमदार विनय नातू आणि बाळ माने तसेच ऍड. दीपक पटवर्धन, सौ. पटवर्धन उपस्थित होते.