मळगांव घाटीत एसटीचा अपघात

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी रेडी राज्य मार्गावरील मळगाव घाटीत सावंतवाडीहून शिरोडा कडे जाणारी एस टी बस कलंडली. सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला. समोरुन येणाऱ्या स्कूल बसला साईड देण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला. या बस मध्ये जास्त प्रवासी नव्हते त्यामुळे सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाहीत. पोलीस व एसटीचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.