मुख्यमंत्री “माझी शाळा सुंदर शाळा” स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यात भोके आंबेकरवाडी शाळा तालुक्यात पहिली तर जिल्ह्यात तिसरा क्रमांकावर 

रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत भोके आंबेकरवाडी शाळेने तालुक्यात पहिला तर जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटाकावला आहे.आय एस ओ मानांकन प्राप्त शाळेचे हे यश शाळेचे मेहनती शिक्षक, विध्यार्थी, पालक वर्गाच्या उल्लेखनीय सहभागाचे फलित असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

शाळेने अनेक विध्यार्थी गुणवत्ता विकासाचे उपक्रम राबवून समाज सहभागामध्ये उल्लेखनीय काम केले आहे. शाळेविषयी ग्रामस्थांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण केल्यामुळे शाळेने 15 लाखाचा शैक्षणिक उठाव या उपक्रम कालावधीमध्ये जमा केला सद्यस्थितीमध्ये शाळेमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, गांडूळ खत प्रकल्प , रंगरंगोटी, स्मार्ट टीव्ही प्रत्येक वर्गात पाण्याची फिल्टर व्यवस्था स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही व्यवस्था अशा प्रकारच्या अनेक व्यवस्थेमुळे भोके आंबेकरवाडी ही शाळा लोकांच्या पसंतीला उतरली त्याचाच परिपाक म्हणून शाळेला नुकतेच आय एस ओ 9001- 2015 हे मानांकन प्राप्त केले आहे.

 

शाळेच्या या उज्वल यशासाठी मेहनत घेणारे मुख्याध्यापक प्रदीप जाधव, पदवीधर शिक्षक सतीश नेवरेकर, उपशिक्षिका श्रीमती ऋतुजा आयरे, उपशिक्षक वैजनाथ जाधव यासहित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शैलेश आंबेकर, उपसरपंच संजय गावडे, कृष्णा आंबेकर, मंगेश जाधव,

वसंत सुर्वे, शांताराम आंबेकर गुरुजी तसेच ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी या सर्वांचेच शाळेच्या यशामध्ये मध्ये खूप मोठा वाटा आहे.