शिमगोत्सवासाठी २२ पासून ठाणे-खेड बस फेरी धावणार

खेड  (प्रतिनिधी)ठाणे-कळवा येथील सामाजिक कार्यकर्ते अक्षय महापदी यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर शिमगोत्सव

कालावधीत २२ ते ३१ मार्च याकालावधीत जादा ठाणे-खेड बसफेरी चालवण्यात येणार आहे.

 

राज्य परिवहन ठाणे विभागाचे विभाग नियंत्रकांनी तसे लेखी पत्रही त्यांना दिले आहे. शिमगोत्सवासाठी

विन्हेरे-तुळशी-खेड ठाणे-महाड, मार्गावर

होळीनिमित्त जादा गाडी सुरू करण्याची मागणी एसटी महामंडळाकडे करण्यात आली होती. यासाठी अक्षय महापदी यांनी एसटी महामंडळाकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. २२ मार्चपासून बसफेरी धावणार असून आरक्षणही खुले झाले आहे. या बसफेरीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.