खेड (प्रतिनिधी)येथील विभागीय कार्यालयातील १८० हून अधिक महावितरण कंपनीच्या कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांनी दोन दिवस कामबंद ठेवत आंदोलन केले. कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्वरीत पूर्ण न झाल्यास ५ मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले जाईल, असा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला.
या क्रमबद्ध कामबंद आंदोलनात वीज क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे झोनल अध्यक्ष किशोर साळुंखे, विभागीय सचिव सतिश भोसले, वर्कर्स फेडरेशनचे जिल्हा सर्कल सचिव महेश डिंगणकर, मागासवर्गीय संघटनेचे विभागीय सचिव स्वप्निल कुंभार, सचिन
कांबळे, सबॉनियट इंजिनिअर असो. चे संघटक नीलेश नानाटे. विद्युत क्षेत्र तांत्रिक कर्मचारी संघटनेचे राजकुमार पवार, नंदू कदम, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन कोकण परिमंडल जिल्हा उपाध्यक्ष सुनील पडवेकर, मंडल सदस्य दिलीप मोहिते यांच्यासह कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले होते.









