खेड Updates : खेड सुद्धा पूर्वपदावर

 

खेड | प्रतिनिधी :

1. सध्या जगबुडी नदीची पाणी पातळी 6.50 मी आहे. सध्या शहरामधील कोणत्याही भागात पाणी भरलेले नाही.

2. खेड शहरात 19.07.2023 रोजी झालेल्या अतिवृष्टी मुळे पुराच्या पाण्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

3. सदयस्थितीला पावसाचे प्रमाण कमी असून वाहतूक व वीज पुरवठा सुरळीत सुरु आहे.

4. खेड नगर परिषदेकडून करण्यात आलेल्या स्वच्छतेनंतर खेड मधील मार्केट पूर्णत: सुरु झाले आहे.

5. प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून सुरक्षितेच्या दृष्टीने रघुवीर घाट दिनांक 20/7/2023 ते दिनांक 31/7/2023 पर्यंत पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे.

6. सद्यस्थितीत खेड तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्त हानी झालेली नाही.