महामार्गावरील जानवली येथील अपघातात एक गंभीर

कृष्णनगरी येथील पहाटेची घटना ; बोलेरो कार पलटी

 कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर कणकवली पासून चार किलोमिटर अंतरावरील जानवली कृष्ण नगरी नजीक बोलेरो कार पलटी होऊन अपघात झाला. यामध्ये चालक अक्षय ज्ञानदेव केळकेंद्र (वय– २८,रा. अहमदनगर हा गंभीर जखमी झाला आहे. बोलेरो कार मुंबई ते गोवा अशी जात होती. पहाटे पाचच्या सुमारास चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार महामार्गावर पलटी झाली.

अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी चालकाला उपजिल्‍हा रूग्‍णालयात दाखल केले. त्‍यानंतर अपघातग्रस्त कार महामार्गाच्या बाजूला करून महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.