जिल्हा भंडारी महासंघाची १० मार्च रोजी सावंतवाडीत होणार “जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा”

वेंगुर्ले | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघामार्फत भंडारी समाजातील तरूणांना प्रोत्साहीत करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही रविवार दि. १० मार्च रोजी सावंतवाडी जिमखाना मैदान येथे सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ चषक २०२४ या भव्य जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यांत आले आहे. यावेळी या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद सावंतवाडी तालुक्याला मिळालेले आहे.

या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यातून प्रत्येकी दोन संघ तालुक्याच्या नावाने ए व बी. असे या स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. संबधित तालुक्यांनी आपली नावे दि. ९ मार्चपर्यत प्रसाद अरविंदेकर- ९४२२६३३३३९ यांचेकडे नोंदवावयाची आहेत. या जिल्हास्तरीय स्पर्धेतून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी एका संघाची निवड केली जाणार आहे. प्रथमच यावर्षी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे नियोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत भंडारी समाजाच्या तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष रमण वायंगणकर यांनी केले आहे.