चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील तांबडवाडी विकास मंडळ चिवेली ग्रामस्थ , पुणे व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवार दिनांक ८ ते ९ मार्च रोजी सार्वजनिक श्री महाशिवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
शुक्रवार दिनांक ८ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता अभिषेक व शिवपूजन, सकाळी १० वाजता महाआरती, सकाळी १०.३० वाजता भजन व दिंडी, दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजता पालखी मिरवणूक, सायंकाळी ७ वाजता ह भ प आग्रे महाराज काडवली यांचे कीर्तन, रात्री १२ वाजता पालखी मंदिर प्रदक्षिणा असा कार्यक्रम होईल.
त्यानंतर शनिवार दिनांक ९ मार्च रोजी सकाळी ८ वाजता सत्यनारायण महापूजा, सकाळी १०.३० वाजता महाआरती, सकाळी ११.३० वाजता सत्कार समारंभ, दुपारी १ वाजता महाप्रसाद , सायंकाळी ५ वाजता भव्य क्रिकेट स्पर्धा, रात्री १०.३० वाजता श्री महाकाली नमन मंडळ कोलथे कुंभारवाडी यांचा बहुरंगी कार्यक्रम होईल. या महाशिवरात्री उत्सवात सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन तांबडवाडी विकास मंडळ आणि महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.











