आदर्श महिला समाजरत्न पुरस्काराने अश्विनी जाधव सन्मानित

Google search engine
Google search engine

सह्याद्री लाईव्ह महाराष्ट्र व सह्याद्री सोशल फाउंडेशन “सह्याद्री भूषण” सोहळा २०२३ संपन्न

कणकवली| प्रतिनीधी : सह्याद्री लाईव्ह महाराष्ट्र व सह्याद्री सोशल फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज तालुक्यामध्ये गडहिंग्लज नगर परिषद येथे सह्याद्री भूषण राज्यस्तरीय सोहळा संपन्न झाला. यावेळी जिल्हास्तरीय आदर्श महिला समाजरत्न पुरस्काराने अश्विनी जाधव यांना गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी मुख्य संपादक व संस्थापक सह्याद्री सोशल फाउंडेशन महाराष्ट्र नितीन बोटे, संपादक संभाजी जाधव,कार्यकारी संपादक धनाजी देसाई , कोकण विभाग प्रमुख विनोद जाधव, कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र यादव , यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमास राधानगरी भुदरगड आजरा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रकाश आबिटकर,जी प सदस्य जिवमदादा पाटील, गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर, नियोजन मंडळाचे सदस्य अशोकअण्णा चराठी , मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष पुंडलिक जाधव,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित हा सोहळा पार पडला.यावेळी आम.आबिटकर अध्यक्ष स्थानावरून बोलताना म्हणाले, सह्याद्री लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी होणारा हा पुरस्कार वितरण सोहळा समाजाला उमेद देणार आहे. आज या ठिकाणी ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. आपल्या सर्वांना भावी वाटचालीस शुभेच्छा व सह्याद्री लाईव्ह या सर्वप्रथम असेच कार्यक्रम घेऊन समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या लोकांचे कौतुक करण्यासाठी भविष्यकाळात चांगले यश मिळावं असे श्री.आम. आबिटकर म्हणाले.