सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील भटवाडी भागातील चंद्रभागा तळी येथे गणेश मूर्ती विसर्जनासाठी कायमस्वरूपी लोखंडी प्लॅटफॉर्मची उभारणी करण्यात आली आहे. माजी नगरसेवक संजय पेडणेकर आणि त्यांच्या मित्रमंडळींनी पुढाकार घेऊन हे काम पूर्ण केले आहे. यामुळे गणेश भक्तांना मूर्ती विसर्जन करणे अधिक सोयीचे झाले आहे.
यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी भटवाडीतील नागरिकांनी चंद्रभागा तळी येथे गणेश विसर्जनाची सोय व्हावी अशी मागणी केली होती. या मागणीनुसार तळी कडील गटारावर फरशी टाकण्यात आली आणि मूर्ती विसर्जनासाठी एक लोखंडी प्लॅटफॉर्म डाईस तयार करण्यात आला. यामुळे मूर्ती विसर्जन करताना होणारी गैरसोय टळली आहे. या नव्या सुविधेमुळे गणेश भक्तांना सुरक्षित आणि सोयीस्कर पद्धतीने मूर्ती विसर्जन करता आले.
या उपक्रमासाठी श्री. शाम हळदणकर, श्री. मोहन गावडे, श्री. अरविंद केरकर, श्री. प्रसाद कोधे, श्री. निलेश पेडणेकर, श्री. शरद पेडणेकर आणि भटवाडीतील इतर ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. या कायमस्वरूपी सोयीमुळे पुढील वर्षी देखील गणेश विसर्जन करणे सुलभ होणार आहे.











