कुमारी निधी पाटकर हीची अभ्यास दौऱ्यासाठी निवड

 

मंडणगड l प्रतिनिधी : जिल्हा परिषद रत्नागिरी समग्र शिक्षण अभियान अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांचा राज्याबाहेरचा अभ्यास दौऱ्यासाठी शहरातील नूतन विद्यामंदिर या शाळेतील कुमारी निधी संजय पाटकर हिची निवड करण्यात आली आहे.

बँगलोर येथील वैज्ञानिक म्युझियम सेंटर, इस्रो सेंटर, तसेच बॉटनिकल गार्डन. आणि बनिगट्टा नॅशनल पार्क, बँगलोर ,कर्नाटक येथे भेट देण्याकरिता जिल्हा परिषद रत्नागिरी प्राथमीक यांनी कुमारी निधीची हिची निवड केली आहे.

या निवडीबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सायली रांगले, वर्गशिक्षक किशोर आंधळे, नारायण कोकाटे, सुहास रांगले, शिवप्रसाद हात्ते, श्रीकांत जाधव, सौ. तळणे, सौ. सुर्वे, सौ. पावरे, सौ. पवळ, पालक संजय व श्वेता पाटकर यांनी अभिनंदन केले आहे. या निवडीबद्दल कुमारी निधी हिचे तालुक्यातून सर्व स्तरातून कौतुक होत आहे.