
ओटवणे(प्रतिनीधी) गेल्या कित्येक वर्षांचा मंदिर बांधण्याचा सरमळे ग्रामस्थ भाविक यांच्या स्वप्नवत इच्छा पूर्ततेचा दिन अखेर उगवला आणि सूर्यास्तानंतर या कामाची कलशरोहणाने एका सुवर्ण पहाटेने सांगताही झाली.
सरमळे येथील सपतना थ मंदीर एका रात्रीत बांधण्याच स्वप्न देवीच्या कौलाने आणि गोव्यातील एका भाविकाच्या मोठ्या आर्थिक साहाय्याने ग्रामास्थानी पाहिल पण हे काम करताना यासाठी प्रचंड मेहनत आहे याची जाण ग्रामस्थाना होती मात्र देवीचा कौल आणी सपतनाथ देवाच्या आशीर्वादाची शिदोरी यामुळे मिळालेली उर्जा ग्रमस्थाना या कामी आली आणि हे काम अखेर सर्वांच्या सहकार्याने एका रात्रीत पूर्ण झाले. हा सोहळा भाविकांनी मंदिराच्या पाव्यापासून ते कळसा पर्यंतचा क्षण डोळ्यात साठवून घेत या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचा साक्षीदार होण्याच भाग्य मिळविले. आज ६मार्च ला मंदीर सुशोभीकरण सजावटी च काम करण्यात येणार आहे. उद्या गुरुवारी ७मार्च रोजी मंदिरातील मुर्त्यांची पप्रतिष्ठापना नंतर ३वाजता सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद व या कार्यक्रमाची सांगता ८मार्च रोजी.शिवरात्रीला सकाळ पासून धर्मीक कार्यक्रम ६वाजल्यापासून ऊशिरा पर्यंत जिल्हास्तरीय भजन स्पर्धा होणार आहे. भविकानी याचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान, सरमळे ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.










