आमदार नितेश राणे यांनी केले पवार बंधूंचे पक्षात स्वागत
वैभववाडी | प्रतिनिधी
उबाठा सेनेचे कोकिसरे गावचे शाखाप्रमुख दीपक दत्ताराम पवार यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे. आमदार राणे यांनी श्री पवार यांचे पक्षात स्वागत केले. तसेच दिगंबर समा पवार यांनी देखील भाजपा पार्टी मध्ये प्रवेश केला.
कोकिसरे गावच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी श्री. पवार यांचा पक्ष प्रवेश पार पडला.
यावेळी वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष नासीर काझी, माजी सभापती भालचंद्र साठे, माजी सभापती अरविंद रावराणे, सुधीर नकाशे, प्राची तावडे, सरपंच प्रकाश सुतार, माजी सरपंच दत्ताराम सावंत. अवधूत नारकर, दाजी पाटणकर, विलास प्रभू, परशुराम इस्वलकर, उदय पांचाळ तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











