वाडा सडेवाडी ते पालये सप्तकोटेश्वर मंदिर या रस्त्यावरील अवजड वाहतूक थांबवली

वाडा सडेवाडी ते पालये सप्तकोटेश्वर मंदिर या रस्त्यावर आनंदवाडी प्रकल्पा साठी 25 टना पेक्षा जास्त मातीची वाहतूक होत होती गेले 22 वर्षे तेथील ग्रामस्थ या रस्त्यासाठी प्रयत्न करत होते आमदार नितेश राणे यांनी हा रस्ता मंजूर करून दिला आणि त्याचे डांबरीकरणही झाले. प्रकल्पाला होणाऱ्या मातीच्या वाहतुकीमुळे रस्ता खराब होऊ लागला होता
सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे माजी उपाध्यक्ष बाळ खडपे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा चे जेष्ठ कार्यकर्ते गुरुनाथ कांबळे व पडवणे येथील स्थानिक बाबू आंबेरकर यांनी पवनचक्की प्रकल्प सांभाळणाऱ्या

बेनसी इन्फ्रा चे संचालक आनंद कांबळे यांची भेट घेतली व वस्तुस्थिती समजावून सांगितली. त्यांनी या भागातली वाहतूक तातडीने बंद करू असे आश्वासन दिले आहे
गेली कित्येक वर्ष रस्ता होत नव्हता आमदार नितेश राणे यांनी हा तो रस्ता करून दिला मात्र तो रस्ता पुन्हा खराब झाल्यास शेतकरी बागायतदार यांना फार अडचणीचे ठरेल यामुळे बाळा खडपे यांनी पुढाकार घेऊन भेट घेतली. यामुळे त्यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत