कणकवली : येथील परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्यावतीने महाशिवरात्री उत्सव ८ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त पहाटे ५:३० वाजता काकड आरती, परमहंस भालचंद्र महाराज समाधी पूजन, सकाळी ११ ते १ समाधिस्थानी लघुरुद्र व आरती, दुपारी १ वाजता खिचडीप्रसाद, दुपारी १ ते सायंकाळी ५ भजने, सायंकाळी ५ वाजता परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची कणकवली शहरातून सवाद्य मिरवणूक, त्यानंतर आरती होईल.
भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.











