खेड (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून माध्यमातून येथील नगरपरिषद दवाखाना कार्यक्षेत्रातील ७ केंद्रांसह मोबाईल व ट्रांझिट पथकामार्फत १०४० अपेक्षित बालकांपैकी ० ते ५ वर्षाखालील ७५९ तर पाच वर्षावरील १६
बालकांचे लसीकरण करण्यात आले.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय पवार, विस्तार अधिकारी नरेश इदाते यांच्या मार्गदर्शनाखाली न.प.तील लिपिक संतोष जाधव, आरोग्य सहाय्यक निलेश सकपाळ, आरोग्यसेवक अरूण जाधव, सचिन जाधव, मंगेश राऊत, आरोग्यसेविका श्रीमती व्ही. बी. नाईक, सोनाली कदम, महिमा चोपडे, परिचर लक्ष्मण शिबे आदींनी प्रयत्न केले.









