सिंधुदुर्गातील खेळाडूंचे नॅशनल पॉवरलिफ्टींग स्पधेत अभूतपूर्व यश 

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सूरत येथे संपन्न झालेल्या नॅशनल पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील सौ. स्मिता जगदीश पोटे यांनी ८४ किलो

वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले. त्या स्ट्रॉंग वुमन ऑफ इंडियाच्या मानकरी ठरल्या. तर ५७ किलो वजनी गटातून वेंगुर्ला येथील कु. रेश्मा तानाजी ढोकरे यांनी सुवर्ण पदक पटकावित त्याही स्ट्रॉंग वुमन ऑफ इंडियाच्या मानकरी ठरल्या. हे.

या दोघींनीही दैनंदिन कामकाजातून वेळ काढत या खेळाचा सराव केला होता. या स्पर्धेसाठी देशभरातून आलेल्या महिला खेळाडूंवर मात त्यांनी हे उज्वल यश प्राप्त केले. या दोघींचेही सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे.

दरम्यान, याच स्पर्धेतील ६६ किलो ( ज्युनि.) म्हणजेच मुलांच्या गटात बाळकृष्ण विश्राम परब याने सुवर्णपदक पटकावले. तर ७४ किलो वजनी गट (मुली) गटात हेमांगी गजानन मिस्त्री ही सुवर्णपदकाची मानकरी ठरली. तर यश सावंत याने देखील या स्पर्धेत सहभागी होत आपले कौशल्य सिद्ध केले.

नॅशनल पावर लिफ्टिंग स्पर्धेतील या यशामागे कोकण सिंधू पॉवरलिफ्टिंग सिंधुदुर्ग सचिव व प्रशिक्षक संजय साटम मार्गदर्शक मंगेश भोगळे तसेच शिवाजी फिटनेस क्लबचे शिवाजी जाधव व जगदीश दत्ताराम या सर्वांचे मोठे सहकार्य लाभले. जिल्ह्यातील या खेळाडूंच्या यशामुळे यापुढे देखील पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारे खेळून यश मिळविण्याचा मानस यावेळी सौ. स्मिता पोटे व अन्य विजेत्या खेळाडूंनी व्यक्त केला. तसेच त्यासाठी सहकार्य करणारे मार्गदर्शक शिक्षक व अन्य सर्वांचे आभार व्यक्त केले.