सावंतवाडी । प्रतिनिधी : माडखोल येथील काजु बागेत काजु चोरी केल्याच्या संशयातून माडखोल येथील विजय राऊळ याला रिपीने बेदम मारहाण करीत जखमीचे हात,पाय फ्रेक्चर करून डोक्यावर गंभीर दुखापत केल्याच्या घटेनेतील संशयित आरोपी संजय गावडे (रा.आंबोली ) याच्या विरुद्ध सावंतवाडी पोलीस स्टेशन येथे भा. द.वी. कलम 452,323,324,325,326 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संशयिताला आज न्यायालयासमोर हजर केले असता त्याची रक्कम रुपये ३० हजारच्या जामीनावर अटी व शर्ती नुसार न्यायदंडाधिकारी (प्र. व) श्रीमती आर. जी. कुंभार यांनी मुक्तता केली. संशयिताच्यावतीने ॲड. परिमल नाईक, यांच्या सह. ॲड. सुशील राजगे, ॲड. रश्मी नाईक, ॲड. राहुल मडगावकर, ॲड. अमिषा बांदेकर यांनी काम पहिले.











