गावडे आंबेरे सातपऱ्या पुलाच्या भरावाचे काम विकॄष्ट व दर्जाहीन 

गावखडी l वार्ताहर : रत्नागिरी तालुक्यातील गावडे आंबेरे येथील प्रस्तावित पुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाहीन भोगस झाले असून शासनाचे सर्व नियम व अटी शती यांचे भंग करून सदरचे काम होत आहे , राष्ट्रवादीचे पावस विभाग अध्यक्ष संतोष पोकडे यांनी म्हटले

शासनाची फसवणूक होत असल्याबाबत माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना लेखी निवेदनानुसार कळविले होते , परंतु त्यांनी अघाप पर्यंत याबाबत कार्यवाही केलेली नाही तसेच संबंधित पुलाच्या जोडकामाच्या भरावाचे काम नियोजित आराखडय़ा नुसार होत नसून केवळ ठेकेदार प्रस्तावित आराखडय़ात जाणीव पूर्वक हेळसांड करून कामाची रेटली करत आहेत

भरावासाठी आवश्यक तरतूदी नुसार माती ,काळे दगड व अन्य समान बाहेरून आणण्याची तरदुत असताना सुध्दा जवळच नदीत पडलेला गाळ काढून भरावात टाकत आहेत हे सर्व कामगिरी करत असताना बांधकाम विभागाचा शाखा अभियंता कामावर उपस्थित न राहता त्यांच्या आशीर्वादानेच हे भोगस काम चालू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे पावस विभाग अध्यक्ष संतोष पोकडे यांनी केला असून सर्व कामाची फेर चौकशीची मागणी केली आहे