क्रिएटिव्ह सखी ग्रुपच्या पाककला स्पर्धेत चित्रा भिसे प्रथम

 

 

बांदा l प्रवीण परब ;     बांदा येथील क्रिएटिव्ह सखी ग्रुपतर्फे महिला दिनानिमित्त आयोजित पाककला स्पर्धेत चित्रा भिसे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. सिंधिया पावसकर द्वितीय तर संपदा देसाई यांनी तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

 

क्रिएटिव्ह सखी ग्रूपतर्फे आयोजित पाककला स्पर्धेसाठी ताज्या फळांपासून पदार्थ बनविणे हा विषय देण्यात आला होता. स्पर्धेचे उद्घाटन बांदा सरपंच प्रियांका नाईक, उद्योजिका अक्षता गवस, तलाठी वर्षा नाडकर्णी, निवृत्त शिक्षिका अमिता स्वार, आनंदी कॅटर्सचे महेश शिरोडकर, रचित कॅटर्सचेे साईप्रसाद वीरनोडकर, हॉलिडे इन गोवाच्या शेफ सोनल पांगम उपस्थित होते.

 

मंडळाच्या अध्यक्षा अंकिता स्वार यांनी सर्वांचे स्वागत केले. भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक चित्रा भिसे (मिक्स फ्रूट केक), द्वितीय सिंधिया पावसकर (संत्र्याची बर्फी), तृतीय संपदा देसाई, उत्तेजनार्थ प्रथम स्नेहा धामापूरकर, द्वितीय प्रिया केसरकर.

 

स्पर्धेमध्ये सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक व बक्षीस हे देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला क्रिएटिव्ह सखी ग्रुपच्या सावली कामत, सोनाली राणे, श्रेया गोवेकर, प्रिया नाटेकर, श्रुती शिरोडकर, तन्वी काणेकर, साधना पांगम, श्रुती वळंजू, माधुरी पावसकर, वंदना पावसकर, उज्वला महाजन, श्रुती गोवेकर, जयश्री गोवेकर, रूपाली शिरसाट, सिद्धी  पावसकर, पल्लवी पावसकर, संपूर्ण क्रिएटिव्ह ग्रुपच्या सदस्या उपस्थित होत्या. स्पर्धेचे सूत्रसंचालन स्नेहा पावसकर, प्रस्तावना रिया वाळके व आभार मृणाल तोरसकर यांनी मानले.