संगलट गावातील चोरीचा तपास गतिमान करावा ग्रामस्थांचे पोलिसांना निवेदन

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील संगलट गावच्या मोहल्यामध्ये ५ जानेवारी ते २१ फेब्रुवारी २०२४ च्या दरम्यान संगलट मोहल्ला येथील रहिवासी कय्युम मोहम्मद नाडकर यांचे घरातून अज्ञात चोरट्याने बंद घरातून सुमारे ४ लाख रुपयाचे तांबा भांडी व इतर साहित्य चोरी केल्याची घटना घडली या चोरीचा तपास वेगाने व्हावा या मागणी साठी ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना निवेदन सादर करण्यात आले

सदरची घरफोडी करताना गॅस कटर च्या माध्यमातून ग्रील कापून आत मध्ये प्रवेश करण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली गेल्या अनेक दिवसापासून या बाबीचा तपास लागत नसल्याने ग्रामस्थांनी पोलिसांची भेट घेत निवेदन सादर केले

 

खेड खारीपट्ट्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून ही तिसरी घटना घडली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे यापूर्वी करजी शिरशी आणि आता संगलट गावात ही चोरीची घटना घडली आहे संगलट गावामध्ये ही प्रथमच एवढी मोठी चोरी झाली असल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे गावामध्ये अनेक घरे बंद असून सदर यांच्याही देखील घराला धोका निर्माण झाली असल्याची चर्चा जनतेतून सुरू आहे

 

सदरचा चोरट्याचा त्वरित तपास लागावे अशी संगलट गावातील जनतेतून जोरदार मागणी आहे चोरी होऊन अनेक दिवस झाले असताना चोरट्याचा तपास लागत नसल्याने जनतेतून नाराजी पसरली आहे

 

तपास गतिमान करणार पोलीस निरीक्षक नितीन भोयर

 

खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी ग्रामस्थाला सांगितली आपण चोराच्या मागावर असून आमच्या तपास गतिमान आहे लवकरच लवकर गजाआड करण्यात येईल असे भोयर यांनी सांगितले