खेड (प्रतिनिधी) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी चे . अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री एस एस गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली तालुका विधी
सेवा समिती, खेड यांचे मार्फत खेड येथील न्यायालयात आयोजित करण्यात येणा-या लोक अदालतीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.
रविवार ५ मे, २०२४ रोजी होणारी राष्ट्रीय लोक अदालत आता २७ जुलै, २०२४ रोजी घेण्यात येणार आहेत.
हा बदल राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार करण्यात आला आहे. खेड न्यायालयातील ज्या प्रकरणांना ५ मे अशी तारीख देण्यात आली होती त्यांची नवीन तारीख संबंधितांनी इकोर्ट ऍपमध्ये पहावी किंवा अधिक माहितीसाठी तसेच ज्या नागरिकांना आपली प्रकरणे २७ जुलै २०२४ च्या लोक अदालत मध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा तालुका विधी सेवा समिती, खेड येथे संपर्क साधावा, असे आवाहन तालुका
विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश १, खेड डॉ. सुधीर एम. देशपांडे यांनी केले आहे.










