मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन मंजूर किर्लोस आंबवणे पावणादेवी मंदिर ते खांदारवाडी रस्त्याचे भाजप नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

अमित खोत | मालवण : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत किर्लोस आंबवणे पावणादेवी मंदिर ते खांदारवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या माध्यमातून 2 कोटी 45 लाख रु. निधीमंजूर झाला. या विकासकामाचा शुभरंभ भाजप नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी सभापती सुनील घाडीगावकर, माजी उपासभापती राजू परुळेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, बाळा लाड, प्रवीण घाडीगावकर, अभि लाड , दिलीप घाडीगावकर, कमालाकांत कुबल, सरपंच साक्षी चव्हाण, धोंडी चिंदरकर, प्रकाश भावे, विनोद भावे यासह ग्रामस्थ उपस्थित होते. रस्त्याची मागणी पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी निलेश राणे व शासनाचे आभार मानले.