संदेश उर्फ गोट्या सावंत, सौ.संजना सावंत यांच्या पाठपुराव्याला यश
२५० हेक्टर जमीन येणार ओलिताखाली,नाटळ ग्रामस्थांची मागणी केली पूर्ण
कणकवली : आमदार नितेश राणे यांनी नाटळ वासियांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. नाटळ राजेवाडी लघुपाटबंधारे धरणाला शासनाकडून प्रशासकीय मान्यता मिळवून आणली आहे. तर धरणासाठी ६० कोटी रुपयांचा निधी सुद्धा मंजूर करून घेतला आहे. २५० हेक्टर जलसिंचन क्षमता असलेल्या या नाटळ राजेवाडी लघुपाटबंधारे धरण प्रकल्पासाठी माजी जि.प. अध्यक्ष संदेश सावंत व सौ.संजना सावंत यांनी सातत्य पूर्ण पाठपुरावा केला.
या धरण प्रकल्पासाठी ६० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. स्थानीक ग्रामस्थांची नाटळ राजेवाडी येथे मृद जलसंधारण खात्यामार्फ़त लघुधरण बांधण्यात यावे अशी वर्षानुवर्ष मागणी होती. मात्र आजवर शाब्दिक आश्वासनापलीकडे काहीच होत नव्हते. गावपुरुष बबन सावंत, नाटळ सरपंच सुनील घाडीगांवकर, उपसरपंच तायशेट्ये यांनी माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत, संजना सावंत यांच्या माध्यमातून आमदार नितेश राणेंकडे लघुधरण बांधण्याची मागणी केली होती.हे धरण झाल्यामुळे नाटळ गावात सुमारे २५० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून गाव सुजलाम सुफलाम होण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे तातडीने हा प्रकल्प मंजूर व्हावा अशी मागणी केली होती. त्यावेळी आमदार नितेश राणे यांनी लवकरात लवकर हे धरण मंजूर करण्याचा शब्द दिला होता. ४ मार्च रोजी या धरण प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून ६० कोटी कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.त्यासाठी आमदार नितेश राणे यांनी जलसंधारण मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,अर्थमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता .










