तिसंगीतील वणव्यात झाडे जळून खाक

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील तिसंगी फाटा येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास लागलेल्या वणव्यात लगतची झाडे जळून खाक झाली. यात मोठे नुकसान झाले. वणवा नेमका कुणी लावला, याचा उलगडा होवू शकला नाही. वणवा लागल्याचे ग्रामस्थांच्या येताच ग्रामस्थ निदर्शनास घटनास्थळी पोहचले. मात्र उन्हामुळे आगीचा भडका उडून वणवा विस्तारत गेला. यामुळे डोंगरावरील गवतासह झाडांची राखरांगोळी झाली. गेल्या काही दिवसांपासून वस्तीलगतच्या मोकळ्या जागेसह डोंगराळ भागावर वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे.