भोस्ते घाटातील अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी

 

खेड (प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटानजीक दुचाकीने डम्परला दिलेल्या धडकेत राहुल राजेंद्र रेडीज हे गंभीररित्या जखमी झाले

. खोपीफाटा येथे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्या ठिकाणाहून दुचाकीस्वार चुकीच्या बाजूने चिपळूणच्या दिशेने जात असताना चिपळूणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला दुचाकीची धडक बसली. यात गंभीररित्या जखमी झालेल्या रेडीज यांच्या पायाला मोठी दुखापत झाली. अपघाताचे वृत्त कळताच मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी तातडीने घटनास्थळी पोहचून गंभीर जखमीस नजीकच्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.