अभि लाड यांची भाजप युवा मोर्चा मालवण मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती

 

जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री यांनी नियुक्तीपत्र देत निवड केली जाहिर

अमित खोत | मालवण : भारतीय जनता युवा मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकरणी घोषित करण्यात आली. यात किर्लोस मालवण येथील अभिमन्यु (अभि) अर्जुन लाड यांची मालवण मंडळ अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष संदिप मेस्त्री यांनी नियुक्तीपत्र देत निवड जाहिर केली आहे.