फायरब्रँड नेतृत्व आमदार निलेश राणे शिवसेनेचे स्टार प्रचारक

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून स्टार प्रचारक यादी जाहीर

मालवण | प्रतिनिधी : शिवसेना पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थां (नगरपरिषद आणि नगरपंचायत) निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहिर झाली आहे. यात मालवण कुडाळचे आमदार फायरब्रँड नेतृत्व निलेश राणे यांना स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या स्टार प्रचारक यादीत स्थान दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांनी शिवसेना मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व सर्व नेतेमंडळींचे मनःपूर्वक आभार व्यक्त करताना पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. जनतेच्या सेवेसाठी, पक्षासाठी आणि ‘विकसित महाराष्ट्र’ या ध्येयासाठी संपूर्ण समर्पणाने कार्य करण्याचा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.