राजापूरात राजापूर प्रतिष्ठान संस्थेची स्थापना

 

अध्यक्षपदी मोहन पाडावे यांची निवड

राजापूर (वार्ताहर): समाजकार्याची आवड असलेल्या तालुक्यातील विविध क्षेत्रातील मंडळीनी एकत्र येत राजापूर प्रतिष्ठान राजापूर या नावाने संस्था स्थापन केली आहे. या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कणेरी येथील रहिवासी व राष्ट्रीय कबड्डी पंच मोहन पाडावे यांची निवड करण्यात आली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली असून यावेळी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली असून तीची अधिकृत नोंदणी केली जाणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा भरविणे, शालेय विद्यार्थी व तरूणांमध्ये क्रीडा विषयक आवड निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच विविध क्षेत्रातील गुणवंत विदयार्थी, प्राविण्यप्राप्त खेळाडू तसेच सामाजिक क्षेत्रात यश मिळविलेल्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. तसेच आरोग्य शिबीर भरविणे, गरजवंतांना मदतीचा हात देणे आदी विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.

यावेळी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. उपाध्यक्षपदी नंदकुमार पुजारे व हर्षदा खानविलकर, कार्याध्यक्षपदी प्रकाश कातकर, उपकार्याध्यक्षपदी सुधिर विचारे, सचिवपदी राजू कार्शिंगकर, सहसचिवपदी सुभाष नवाळे, संदिप पवार खजिनदार गोपाळ गोंडाळ, सहखजिनदार प्रकाश पुजारे, अंतर्गत हिशोब तपासणी सुबोध पवार, रविंद्र जाधव यांची तर प्रसिध्दी प्रमुख म्हणून राजू जोगळे यांची निवड करण्यात आली.

तर सदस्य म्हणून राजेंद्र गुरव, गौरव सौंदळकर, अभिजीत कदम, संदिप देसाई, सचिन नाचणेकर, विवेक गुरव, निलेश फाटक, विजय बाणे, संदिप पवार, साहिल मुणगेकर, प्रकाश शिंदे, शरद मोरे, प्रकाश नाचणेकर, संतोष मोंडे, राजेंद्र बाईत यांची तर प्रमुख सल्लागार म्हणून सौ. दिपाली पंडित, रविंद्र नागरेकर, रमेश पाडावे, अशोक पाडावे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.