मंडणगड | प्रतिनिधी : मार्च एप्रिल व मे महिन्यात उद्भव विहीरीत पाणी साठा कमी झाल्याने नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये या करिता मंडणगड नगरपंचायतीचेवतीने जानेवारी महिन्यापासून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. उद्भव विहीरीच्या जलस्त्रोतांचे बळकटीकरण सर्व संभाव्य जलस्त्रोतांचा वापर करुन पाणी कपात करावी लागणार नाही यासाठी नगरपंचायत प्रशासनाने कंबर कसली आहे. नुकतेचे नगरपंचायतीचेवतीने निवळी नदीवर मुख्याधिकारी विनोद डवले यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता कमिटी सभापती सुभाष सापटे, प्रशासकीय अधिकारी अभिजीत राणे, पाणी विभाग प्रमुख विकास साळवी, कर्मचारी गणेश सापटे, प्रमोद मर्चंडे, प्रकाश करावडे, मोहन तलार, संतोष शिगवण, रुपेश तांबे, अभिजीत साळवी, महेंद्र मर्चंडे, शरद धोत्रे यांनी श्रमदान करुन सहकार्य केले या उपक्रमामुळे उद्भव विहीरीला पुरेसा पाणी साठा मिळू लागला आहे.