गोळवण येथे नळपाणी योजना कामाचा शुभारंभ!

Google search engine
Google search engine

 

मसुरे | झुंजार पेडणेकर

गोळवण चर्मकारवाडी येथे अनु. जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजने अंतर्गत विंधन विहिर खोदणे, टाकी बांधणे, नळपाणी योजना करणे या कामाचे जमिनमालक श्री. दिपक गोळवणकर यांच्या हस्ते भुमीपुजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. साबाजी गावडे, ग्रा. पं. सदस्य श्री. शरद मांजरेकर, श्री. विरेश पवार, सौ. प्राजक्ता चिरमुले, सौ. मेघा गावडे, तसेच ग्रामस्थ श्री. भाई चिरमुले, श्री. संदेश गोळवणकर, श्री. वसंत गोळवणकर, श्री. महादेव पवार, श्री. तेजस पवार, श्री. सुनिल गावडे, श्री. द्वारकानाथ घाडी, श्री. संदेश पवार, श्री. सत्यवान दाभोलकर, ग्रा. पं. कर्मचारी श्री. बाळाराम परब, श्री. रामकृष्ण नाईक तसेच भटजी काका श्री. अनिल गवंडे इ. उपस्थित होते.