आचरा प्रधानमंत्री विश्वाकर्मा योजना मोफत नोंदणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

भाजप आचरा विभाग, प्रकाश मेस्त्री, समिर बावकर मित्र मंडळा कडून आयोजन

आचरा l अर्जुन बापर्डेकर :             आचरा येथे शनिवारी भारतीय जनता पार्टी आचरा विभाग, प्रकाश मेस्त्री, समिर बावकर मित्र मंडळ आयोजित विश्वकर्मा सन्मान योजना मोफत नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, या शिबीरात 273 लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली.तर 30 जणांची आधार अपडेट्स करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरवात भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर,प्रकाश मेस्त्री किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत,विलास हडकर, वायगणी सरपंच रुपेश पाटकर, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, समिर बावकर, माजी सभापती राजू परुळेकर ,दिपक सुर्वे,ओमकार आचरेकर, शेखर सुतार, चंदू कदम, चंदू सावंत, विवेक परब, नरेंद्र मेस्त यांच्यासह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.

 

या शिबीर पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेतील महत्वाच पाऊल असून आपले अशा कार्यक्रमाना नेहमी सहकार्य असेल तसेच 3000 जणांची नोंदणी व्हावी असे आपले प्रयत्न आहेत असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले. तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जेष्ठ भाजप नेते विलास हडकर यांनी यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने बाबत विचार मांडले.

पळसंब सरपंच महेश वरक, ओमकार आचरेकर, सिद्धेश गोलतकर, रावजी(चंदू) सावंत, स्नेहलता मेस्त्री, संदेश रावले, परेश चव्हाण, चंदू कदम, रवींद्र घागरे, शेखर सुतार, एकनाथ पवार, धर्माजी कोचरेकर , सुहास सावंत, किशोर आचरेकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात साठी मेहनत घेतली.

यावेळी नाभिक समाज जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण, शिवसेना तालुकाध्यक्ष महेश राणे, माजी सभापती राजू परुळेकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे, हनुमंत प्रभू, चिंदर सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, आचरा सोसायटी चेअरमन अवधूत हळदणकर, अश्विन हळदणकर, दत्ता वराडकर, रोहन वराडकर, मनोज हडकर, जितेंद्र तिरोडकर, संदेश चिंदरकर, सिद्धेश नाटेकर,दिगंबर जाधव, विश्राम माळगावकर, यशश्री गोसावी, सुरेंद्र मेस्त्री, किरण पवार,संजय लोके,विलास लोके, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश मेस्त्री यांनी तर सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले.