माजी खास.निलेश राणे यांचा वाढदिवस घरेलु कामगार महीलांच्या उपस्थित भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात साजरा..

वेंगुर्ले | प्रतिनिधी : भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात मा.खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त घरकाम करणाऱ्या महीलांसाठी घरेलु कामगार योजनेचे नोंदणी अर्ज वितरित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी मा.खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील ५०० घरेलु कामगारांच्या नोंदणीची भेट दिली.

यावेळी सर्वप्रथम त्यांनी मा. खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या लोकोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी घरकाम करणाऱ्या महीलांसाठी ही योजना अत्यंत महत्वाची असल्याचे सांगून , या योजनेतून घरकाम करणाऱ्या व्यक्तीचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल , तसेच कामगारांचे जीवनमान सुधारेल. अपघात घडल्यास लाभार्थीना तात्काळ सहाय्य मिळेल, लाभार्थीच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळेल, महीला लाभार्थीना प्रसुती लाभ मिळेल . अशा प्रकारे कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी ही योजना फायदेशीर असल्याचे सांगीतले.

यावेळी घरेलु कामगार महीलांनी केक कापून मा.खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, महीला अध्यक्षा सुजाता पडवळ, मा.नगराध्यक्ष राजन गिरप , जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , मच्छिमार नेते वसंत तांडेल , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , युवा मोर्चा अध्यक्ष प्रणव वायंगणकर , खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी , महीला शहर अध्यक्षा श्रेया मयेकर , अणसुर सरपंच सत्यविजय गावडे , जेष्ठ साहित्यीक अजीत राऊळ सर , किसान मोर्चाचे आनंद ऊर्फ बिटु गावडे , कामगार आघाडीचे प्रशांत नवार , युवा मोर्चाचे भुषण सारंग व मनोहर तांडेल , होडावडा उपसरपंच राजबा सावंत , दिव्यांग आघाडीचे सुनिल घाग , NGO आघाडीचे विजय रेडकर , शक्तिकेंद्र प्रमुख कमलेश गावडे , शिवाजी पडवळ , ग्रामपंचायत सदस्या कार्तिकी पवार , बुथ प्रमुख शेखर काणेकर तसेच अनेक घरेलु कामगार महीला उपस्थित होत्या .