देवगड जामसांडे नगरपंचायत व कुणकेश्वर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कुणकेश्वर येथे सफाई मोहीम

देवगड जामसंडे नगरपंचायत व ग्रामपंचायत कुणकेश्वर यांचे संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक १३ मार्च, २०२४ रोजी सकाळी ०८.०० वाजतां कुणकेश्वर मंदिर परीसर व समुद्रकिनारा येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

सदर स्वच्छता अभियानामध्‍ये देवगड तहसीलदार श्री.श्रीकृष्ण ठाकुर, देवगड जामसंडे नगरपंचायत मुख्याधिकारी श्री.सुरज कांबळे प्रशासकिय अधिकारी श्री. रोहित पाटील कुणकेश्वर ग्रामपंचायत सरपंच माजी उपसरपंच व ग्रामसेवक श्री गुणवंत पाटील नगरपंचायत कर्मचारी, तलाठी, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ सहभागी होते.