खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील तुळशी गावातील सुपुत्र अवधूत अनिल दरेकर याने एमपीएससी कंबाईन परीक्षेत राज्यात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्णझाला. त्याची राज्यकर निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्रही देण्यात आले आहे.
तालुक्यातील एका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकाचा तो मुलगा आहे. तुळशीसारख्या दुर्गम गावातील अवधूत दरेकर याने जिद्द व चिकाटीच्या बळावर एमपीएससी परीक्षा चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण होवून तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुराच रोवला आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.











