माणगांव । प्रतिनिधी : माणगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगांव संचलित श्री देवी यक्षिणी माध्यमिक विद्यालय बेनगाव माणगाव प्रशालेने एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत सुयश संपादन केले आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या शासकिय रेखाकला परीक्षेमध्ये एलिमेंटरी परीक्षेत कुमार मनोज तोरसकर व कु. वेद धुरी यांनी ब श्रेणी प्राप्त केली तर वेलिना परेरा, गार्गी म्हाडगूत, स्वप्नाली शिंगाडे, अर्जुन घाडी, सोहम सावंत, साई घाडीगांवकर, सपना वासकर, अक्षय मेस्त्री, वैष्णवी आईर, दिव्या घाडीगांवकर, अमृता लाड, शंकर परब, सार्थक लाड, अर्थव परब, युवराज जाधव, संचित सावंत यांनी ‘क’ श्रेणी प्राप्त केलीविद्यालयातील तर इंटरमिजिएट परीक्षेत ९ विद्यार्थी बसले होते. महदेव धुरी, वेदांत पालकर, अक्षय कुंभार, तनिशा परब, गौरी मेस्त्री, शुभम सुतार, विशाल पालव, वेदांत धुरी, प्रसाद परब सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यांनी ‘क’ श्रेणी प्राप्त केली. तसेच एलिमेंटरी परीक्षेत कुमार मनोज तोरसकर व कु. वेद धुरी यांनी ब श्रेणी प्राप्त केली तर कु वेलिना परेरा कु गार्गी म्हाडगूत कु स्वप्नाली शिंगाडे कु अर्जुन घाडी कु सोहम सावंत कु साई घाडीगांवकर कु सपना वासकर कु अक्षय मेस्त्री कु वैष्णवी आईर कु दिव्या घाडीगांवकर कु अमृता लाड कु शंकर परब कु सार्थक लाड कु अर्थव परब कु युवराज जाधव कु संचित सावंत यांनी ‘क’ श्रेणी प्राप्त केली.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष श्री सगुण धुरी सचिव श्री एकनाथ केसरकर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विजयप्रकाश आकेरकर अन्य संस्था सदस्य मुख्याध्यापक श्री गोविंदराव साटम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना इंटरमीजिएट परीक्षेला श्री सदाशिव सावंत यांनी तर एलिमेंटरी व भौमितीक पेपर ला श्रीम वैदेही भोगले गुंजाळ यांनी मार्गदर्शन केले.











