खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी मधील दीपक नोव्हा केम प्राय लि या कंपनी मध्ये दोन कामगार भाजल्या प्रकरणी मुजोर कंपनी प्रशासनाकडून गलथान कारभार करत कामगाराच्या जिविताशी खेळल्या प्रकरणी भाजपा चे माजी आमदार विनय नातू हे आक्रमक झाले असून कामगार मंत्री सुरेश खाडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कारवाई करण्या बाबत चे निवेदन सादर करण्यात आले आहे
तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील दीपक नोव्हा केम प्रा लि कंपनी मध्ये तयार होणारे फिनॉल रसायन प्रतीक कांबळे ( वय २२ रा. खेडी ता. चिपळूण ) व प्रशांत कदम (रा. वालोटी ता. चिपळूण )
या दोन कामगारांच्या अंगावर उडाल्याने ते गंभीररित्या जखमी झाल्याची घटना . ८ मार्च रोजी शुक्रवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. होती मात्र या घटने संदर्भात कंपनी प्रशासनाकडे विचारणा केली असता असा कोणताही प्रकार आमच्या कँपनी मध्ये घडलेलाच नव्हता अशी भूमिका घेतली गेल्याने कँपनी प्रशासना वर संशय निर्माण होऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता
दरम्यान या कंपनी सह लोटे औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्यांमध्ये अपघात घडून कामगारांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. या कंपन्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेकरीता कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचे नमूद करण्यात आले असून दिपक नोव्हाकेम कंपनीमध्ये घडलेल्या अपघाताबाबतचे कागदपत्र पाठवण्यात आले आहेत आहे. या बाबत संबंधितांची योग्य ती चौकशी करून कार्यवाही व्हावी अशी विनंती नातू यांनी केली आहे या निवेदना च्या प्रती संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, बी. के. सी. बांद्रा पूर्व- मुंबई -, व सह- संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, नागाला पार्क- कोल्हापूर यांना सादर करण्यात आल्या आहेत









