क्रिकेट स्पर्धेला गेल्या १७ वर्षाची परंपरा
चिपळूण ( वार्ताहर) : ओम फायटर स्पोर्टस क्लब कापरे यांच्या वतीने नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सोमवार दि. २५ रोजी कापरे मधलीवाडी येथे करण्यात आले आहे.
गेली सतरा वर्ष शिमगा उत्सवा निमित्ताने चिपळूण तालुक्यातील कापरे गावात मुंबई पुण्यामधून येणाऱ्या सर्व चाकरमानी यांना क्रिकेट खेळाची मजा घेण्यात यावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना साठी ही स्पर्धा म्हणजे एक आनंदाची पर्वणी असते. गेली सतरा वर्ष ही स्पर्धा धुलीवंदन सणा निमित्ताने घेतली जाते. यावर्षी देखील ही स्पर्धा 25 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे प्रथम बक्षीस ७ हजार २४ रू. व आकर्षक चषक, द्वितीय बक्षीस ५ हजार २४ रू. व आकर्षक चषक, तृतीय बक्षीस ३ हजार २४ रू. आणि आकर्षक चषक असे ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, क्षेत्ररक्षक आणि सामनावीर इत्यादी बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत . एक गाव एक संघ अशा पद्धतीची ही स्पर्धा असेल. प्रवेश फी ६५० रू. आहे. संघाने ८.३० वाजे पर्यंत रात्री स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. स्पर्धेत बदल करण्याचा अधिकार हा पूर्णपणे मंडळाला असेल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अजय मोरे (9960699245) आणि वैभव मोरे (7893519796) या नंबर संघानी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.










