बळीराज सेना पनवेल रायगड यांच्या वतीने स्पर्धेचे केले होते आयोजन
चिपळूण ( वार्ताहर ) : बळीराज सेना पनवेल- रायगड कार्यकारणीच्या वतीने रायगड चषक क्रिकेट स्पर्धेचे दिनांक 17 रोजी सानपाडा येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेवर मुरुड इलेव्हण संघाने नाव कोरले आहे.
बळीराज सेनेकडून प्रथमच मोठी स्पर्धा भरविण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन बळीराज सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रकाश चंदिवडे आणि दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख कृष्णा किंजले यांच्या हस्ते करण्यात आले. रायगड जिल्ह्यामधील एकून 32 संघाने स्पर्धेत सहभाग घेतला होता. मुरुड इलेव्हनने स्पर्धेचे विजेते पद पटकवाले. विशेष अतिथी म्हणून बळीराज सेनेचे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कृष्णा कोबनाक संजय चव्हाण उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजक विनोद मानकर, पनवेल-रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी प्रकाश चांदिवडे, श्री संतोष निवाते, अनिल मोंडे, प्रशांत भेकरे आणि वसंत भुवड हे होते.










