आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी मध्ये विविध गुणदर्शन कार्यक्रम जल्लोषात संपन्न

 

तवसाळ : जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी शाळेच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले होते.

 

‌दिनांक -: ९ मार्च २०२४ रोजी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी वतीने विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी – १० ते १ दरम्यान महिला मंडळ हळदी कुंकू समारंभ कार्यक्रम व रात्री ठिक – ९ वाजता मुलांचे कार्यक्रम सुरूवात झाली.

या कार्यक्रमात शाळेचे विद्यार्थी वर्ग, माजी विद्यार्थी,व तांबडवाडीच्या महिला मंडळ सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. समुहगीत “गणेशाला वंदन” करून गाण्याची सुरुवात पुढे “माझ्या पप्पांनी गणपती आनला” या गाण्याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला, शाळेतील मुलांनी वेगवेगळ्या नाटिका सादर करून अफलातून कॉमेडीने प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमला रंग चढत असताना वायरल गाणं “मुळीच नव्हते रे कान्हा माझ्या मनात” या वयक्तिक गाण्यावर महीला मंडळा कडून सुंदर नृत्य सादर केले.. शेवटी “अंधश्रद्धा निर्मूलन” या विषयावर एक प्रयोग सादर करून प्रेक्षकांना चांगला संदेश दिला, कार्यक्रम सांगता करण्यात आली.

या कार्यक्रमाला मुंबई मंडळ यांच्या वतीने बक्षिसांची उधळण केली व उपस्थित प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आणि रोख रक्कम बक्षिसे देऊन मुलांना प्रोत्साहन दिले सो सर्व देनगिदारांचे मनःपूर्वक आभारी आहोत.

 

तसेच या कार्यक्रमानिमित्त आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडीचा उपक्रम “मिशन आपुलकी अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या आगळीवेगळी एक भेट वस्तू देण्यात आली.

Dj श्री सचिन कुळये यांच्या संकल्पनेतून

शाळेला अनेक कार्यक्रमाला उपयुक्त लागेल हि संकल्पना घेऊन लाईट बोर्ड – एक्टेंशन बोर्ड स्वतः तयार करून भेट दिला.

कै. सविता शंकर कुळये यांच्या स्मरणार्थ

चिरंजीव पारस सचिन कुळये यांच्या हस्ते शाळेला भेट देण्यात आली.

 

या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर शालेय व्य. स. अध्यक्ष श्री रमेश कुरटे, उपाध्यक्षा सौ. वैष्णवी निवाते मॅडम माजी सरपंच सौ. नम्रता निवाते मॅडम शिक्षणप्रेमी श्री विजय मोहिते प्रतिष्ठित ग्रामस्थ चंद्रकांत निवाते, कृष्णा वाघे, बबन कुरटे, विजय नाचरे ,संदीप जोशी, मुंबई मधील मकरंद परब साहेब तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे लाडके डीजे सचिन कुळये शाळेचा कार्यक्रमाला विशेष उपस्थीत ग्रामपंचायत काताळेच्या सरपंच सौ. प्रियंका सुर्वे मॅडम यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या..कार्यक्रमाचे आयोजन श्री. अंकुर मोहिते सर श्रीमती तनुजा सुर्वे मॅडम सौ. राजेश्वरी वेल्हाळ मॅडम शाळा व्य. स. तवसाळ तांबडवाडी तवसाळ तांबडवाडी ग्रामस्थ, महिला मंडळ, मुंबई ग्रामस्थ मंडळ व सचिन कुळये यांनी केले.

 

या कार्यक्रमाचे फोटो/video रेकॉर्ड करण्यासाठी मुंबई वरून खास आलेले व सर्व कार्यक्रमाची धुरा समर्थपणे सांभाळली असे Dj श्री सचिन कुळये तवसाळ तांबडवाडी सोबत श्री निलेश घाणेकर यांची साथ लाभली.

 

शाळेय विविध गुणदर्शन आलेल्या व मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या रशिक प्रेक्षकांचे आभार व धन्यवाद.