शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा संगमेश्वरात पाहिला टप्पा पूर्ण

माखजन |वार्ताहर :     राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे तर्फे इयत्ता नववी ते बारावी इयत्ता ना शिकवणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे क्षमता वृद्धी प्रशिक्षण सुरु आहे.नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर हे प्रशिक्षण सुरु आहे.

रत्नागिरी जिल्हा शिक्षण विभाग व संगमेश्वर पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या तर्फे संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षण घेण्यात येत आहे.यामध्ये १८ ते २० मार्च दरम्यान पाहिला टप्पा तर २१ ते २३ मार्च दरम्यान दुसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण होणार आहे.हे प्रशिक्षण पंचायत समिती संगमेश्वर चे गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षा अभियान चे विषय तज्ञ् समीर कबदुले यांच्या उपस्थित सुरु आहे.हे प्रशिक्षण तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी बुरंबी हायस्कुल येथे सुरु आहे.

या प्रशिक्षणासाठी संगमेश्वर पंचायत समिती शिक्षण विभागाच्या सौ कला मोहिते ,व सौ होतेकर मॅडम या विशेष मेहनत घेत आहेत.या प्रशिक्षणात प्रशिक्षक म्हणून मंदार बापट (नवजीवन हायस्कुल फूणगुस),हणमंत कांबळे(तु.ग.गांधी विद्यालय साखरपा),साक्षी नलावडे( तुळसणी हायस्कुल),अजित जाधव( आर डी गार्डी हायस्कुल कळंबस्ते),प्रशांत सनगरे(ताम्हाणे हायस्कुल),प्रकाश चव्हाण( महात्मा गांधी विद्यालय साखरपा),महादेव शिंदे(माखजन इंग्लिश स्कूल माखजन),विजय केसव (घाटीवळे उर्दू हायस्कुल),दीपक बने (दाभोळे हायस्कूल),चंद्रशेखर गायकवाड (न्यू इंग्लिश स्कूल कसबा),मिलिंद कडवईकर (भाईशा घोसाळकर हायस्कुल कडवई) काम पाहिले.प्रशिक्षकांनी दृक,श्राव्य माध्यमातून व व्याख्यान पद्धतीने नवीन शैक्षणिक धोरणातील विविध मुद्दे प्रभावी पणे मांडले.या प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात संगमेश्वर तालुक्यातील ४० शाळांमधील सुमारे १२५ शिक्षक उपस्थित होते.

पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाच्या समारोपावेळी तालुक्यातील शिक्षक,उपस्थित मुख्याध्यापक,यांनी संगमेश्वर पंचायत समिती शिक्षण विभागाचे आभार मानले.बुरंबी हायस्कुल व संस्थेने प्रशिक्षणासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी बुरंबी हायस्कुल चे मुख्याध्यापक श्री वीरकर,पर्यवेक्षक श्री साठे,माखजन हायस्कुल च्या मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर,डिंगणी हायस्कुल चे मुख्याध्यापक श्री मुंढेकर उपस्थित होते.प्रशिक्षणाच्या उदघाटन प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी सौ मनाली कनावजे उपस्थित होत्या.