पळसंब मध्ये आढळला ‘कॅट स्नेक’!

मसुरे | झुंजार पेडणेकर : पळसंब गावठणवाडी येथे अनिकेत परब यांच्या शेतमांगरात आलेल्या मांजऱ्या प्रजातीच्या सापाला सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. साप असल्याची माहिती ग्रांमपचायत सदस्य  अक्षय परब यांनी माजी सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांना दिली.गोलतकर यांनी वरवडे कणकवली येथील सर्पमित्र श्री.यश वर्दम यांना याबाबत माहिती दिली. वर्दम यांनी सदर सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.

सर्पमित्र यश वर्दम यांनी सदर साप हा बिन विषारी माजऱ्या जातीचा साप असल्याचे सांगीतले. मांजऱ्या सापाच्या अंगावर मांजराच्या त्वचे सारखा रंग आणि चट्टे असल्याने हा मांजऱ्या साप किंवा कॅट स्नेक म्हणून ओळखला जातो. या मांजऱ्या सापामध्ये विशेषकरून दोन रंग बघायला मिळतात एक लालसर  रंग तर दुसरा करडा रंग आहे. फोर्स्टेन कॅट स्नेक हा सहज आढळणारा साप नसून हा झाडाच्या छिद्रात, घरट्यात, ढोलीत विशेषतः आढळतो असे यावेळी सर्पमित्र यश वर्दम म्हणाले.