खेड(प्रतिनिधी)
तालुक्यातील दस्तुरी येथे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर टाकेलेल्या धाडीत ६९० रुपयांची रोकड जप्त करत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई २१ मार्च रोजी दुपारी १२ २० वा च्या सुमारास करण्यात आली.
प्रफुल्ल मदन पिंपळकर रा. चिचंघर दस्तुरी ता. खेड असे गुन्हा दाखल झालेल्या चे नाव आहे पिंपळकर हा आर्यन हॉटेलचे उजवे बाजुस गैरकायदा बिगर परवाना मुंबई या शुभ अंकावर स्वताचे फायद्याकरिता पैसे लावुन खेळ खेळवित असताना मिळुन आला म्हणुन त्याच्या कडून ६९० रु.कि.ची. रोख रक्कम व इतर जुगार साहीत्य जप्त करण्यात आले.









