खेड(प्रतिनिधी)
मुंबई गोवा महामार्गा वरील आवाशी मालकरवाडी नजीक गोवा बनावटीची दारू विकत असताना एकजण आढळून आला त्याच्या कडून ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई २१ मार्च रोजी करण्यात आली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकांत कृष्णा साळवी रा आवाशी असे त्या गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. साळवी हा गोवा बनावटीची दारु गैरकायदा बिगरपरवाना विक्री करत असताना मिळुन आला. ६६०/- रुपये किंमतीचा इंग्रजीत गोल्डन असीई ब्ल्यु फाईन व्हीस्की असे लेबल असलेल्या ७५० मिली मापाच्या गोवा बनावटीची दारु असलेल्या ०६ प्लास्टीकच्या सीलबंद बॉटल जप्त करण्यात आल्या.











