दापोली l प्रतिनिधी : दापोली तालुक्यातील असलेल्या शहरालगत जालगाव सुतारकोंड येथील श्री काळकाई देवस्थानच्या पंचवार्षिक वर्धापन दिनानिमित्त 30 मार्च व 31 मार्च रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये 30 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता देवीची चित्रावळ व रखवालदार मूर्ती मिरवणूक रात्री दहा वाजता प्रासादिक संगीत भजन 31 मार्च रोजी सकाळी सहा वाजता अभिषेक व पूजा सकाळी दहा वाजता चित्रावळ व रखवालदार मूर्ती पूजा व स्थापना सकाळी 11 वाजता श्री सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद सायंकाळी सात वाजता सत्कार व बक्षीस समारंभ रात्री आठ वाजता महाप्रसाद रात्री दहा वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना असे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. हे भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.











