चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील शिरगांव येथील श्री स्वामी समर्थ फाऊंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात लौकीक मिळवणाऱ्या व्यक्ती व संस्थांना तालुकास्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले. याकरिता तालुक्यातील ६० जणांची निवड झाली आहे. यामध्ये डॉ अभिजीत सावंत व डॉ. रश्मी सावंत यांच्या चिपळूण तालुक्यातील श्री हॉस्पिटल ला श्री स्वामी समर्थ फाउंडेशन शिरगावचा उत्कृष्ट हॉस्पिटल हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या पुरस्काराचे वितरण विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी १० मार्च रोजी दुपारी ४ वाजता ब्राम्हणवाडी शिरगांव येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे करण्यात आले.
पुरस्कार वितरणासाठी लोटे येथील आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शामसुंदर भाकरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विधी प्रशाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संचालिका प्रा. डॉ. सौ. ज्योती भाकरे, कोल्हापूर येथील नामांकीत रेशीम व केन शुगर हार्वेस्टिंग उद्योजक डॉ. अभिजीत घाटगे, लोटे येथील उद्योजक सुभाष रहाटे ,निपाणी बेळगांव येथील नामांकीत वैद्यकीय व्यावसायीक डॉ. अमर वंजोळे, सांगली येथील उद्योजक प्रकाश उर्फ पाडुरंग शिंदे, एसएमएस व्हॉस्पीटलचे डॉ. रामेश्वर गौड , श्री स्वामी समर्थ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विशाल पेटकर, उपाध्यक्षा सौ. स्वाती पेटकर, सचिव डॉ. सुमित पवार, समन्वयक शंकरराव यादव,डॉ गणेश देसाई ,डॉ अमित बिडकर,डॉ.अविनाश पाटील व विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.












